पेरु जास्त खाल्याने आरोग्यलाभ काय होतात ?

पेरुतील मुबलक फायबर आणि ग्लायसेमिकचं कमी प्रमाण यामुळे मधुमेहींसाठी हे फळ वरदान ठरतं. 


ग्लायसेमिकच्या कमी प्रमाणामुळे रक्तातली साखरेची पातळी अचानक वाढत नाही. 
तर फायबरमुळे शरीरातलं साखरेंचं कार्य सुरळीत सुरू राहतं.

पेरुमुळे शरीरातील प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि फायबर यांचा सुयोग्य वापर होतो. 
चयापचय क्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते. 

पेरुमुळे पोट भरत असल्याने अति खाणं होत नाही. कच्च्या पेरुत इतर फळांच्या तुलनेत साखरेचं प्रमाण बरंच कमी असतं.

पेरु हा क जीवनसत्वाचा सर्वात मोठा स्रोत आहे. यात क जीवनसत्त्वाचं प्रमाण संत्र्यापेक्षा चौपट असतं. 

यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सर्वसाधारण जंतूसंसर्ग तसंच इतर आजारांपासून पेरुमुळे बचाव होऊ शकतो. पेरुतं पचनाला मदत करणार

फायबरही मुबलक प्रमाणात असतं. शरीराच्या दैनंदिन गरजेपैकी १२ टक्के फायबर पेरुतून मिळू शकतं. 
यामुळं पचनाची समस्या असलेल्यांसाठी पेरु हा रामबाण उपाय ठरू शकतो. 

पेरुच्या बियांमुळे आतडी स्वच्छ होतात. पेरुच्या पानांमध्ये जंतूंचा नाश करणारे गुणधर्म असतात. 

यामुळे दातदुखीसारख्या समस्या दूर होऊ शकतात. पेरुच्या पानांचा रस दातदुखीवरील सर्वात प्रभावी उपाय आहे. या रसाने दात घासल्यास बराच फायदा होतो.

पेरुमधील बी ३ आणि बी ६ या जीवनसत्त्वांमुळे मेंदूला अनेक लाभ होतात. 

या जीवनसत्त्वांमुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो. 
स्मरणशक्तीत सुधारणा होण्यासोबतच मेंदूच्या नसांनाही आराम मिळतो.

पेरुतील अ जीवनसत्त्वामुळे दृष्टी सुधारते. यासोबतच मोतीबिंदू, काचबिंदू यासारख्या डोळ्यांशी संबंधित समस्यांपासून बचाव होऊ शकतो. 

पेरुतील क जीवनसत्त्व आणि लोह यामुळे विषाणूंमुळे होणाऱ्या जंतूसंसर्गापासून बचाव होतो. 

कच्च्या पेरुचा रस किंवा पेरुच्या काढ्यामुळे फुफ्फुसात साठलेला कफ दूर होतो.

मुझे लगता हैं आप कुछ न कुछ समझ गए होंगे। अगर आपको यह पसंद आया तो मुझे नीचे कमेंट करके जरूर बताएं 

तथा आपका कोई ऐसा प्रश्न हो तो वह नीचे लीखिये मैं आपको उसका उत्तर जरूर प्रोवाइड करूँगा।

इसको सभी के साथ शेयर भी करे तभी लोग थोड़ा बहुत इसको पढ़ेंगे और समझ पाएंगे।

Please do not enter any spam link in the comment box !

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने